आभासी अटकेद्वारे सेवानिवृत्त प्राध्यापकाची फसवणूक

आभासी अटकेद्वारे सेवानिवृत्त प्राध्यापकाची फसवणूक

Published on

आभासी अटकेद्वारे सेवानिवृत्त प्राध्यापकाची फसवणूक

मुंबई, ता. २९ ः सेवानिवृत्त प्राध्यापकाला दहा दिवस आभासी अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी सात लाख रुपये उकळले. भामटे तक्रारदाराकडे जामिनासाठी आणखी २५ लाख रुपये मागत होते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वृद्धाची पुढील फसवणूक टळली. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २८) गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार वांद्रे येथील महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगून २ ते ११ नोव्हेंबरदरम्यान आभासी अटकेत ठेवण्यात आले. तपासणीसाठी त्यांना सुमारे सात लाख रुपये विविध खात्यांवर वळते करण्यास भाग पाडले. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून या तपासाबाबत कोणाला काहीही न सांगण्याची सूचना भामट्यांनी केली.

पुढे न्यायालयाचा आभास उभा करून जामीन मिळवण्यासाठी २५ लाख रुपयांचा जातमुचलका भरावा लागेल, असे सांगण्यात आले. तेव्हा तक्रारदाराने सीमाशुल्क विभागात नियुक्त आपल्या एका विद्यार्थ्यांशी संपर्क साधून घटना सांगितली. विद्यार्थ्याने फसवणूक सुरू असल्याचे सांगत तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना केली, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com