‘ड’ संवर्गातील कामगार निवडणुकीच्या कामात

‘ड’ संवर्गातील कामगार निवडणुकीच्या कामात

Published on

‘ड’ संवर्गातील कामगार निवडणुकीच्या कामात
दि म्युनिसिपल युनियनचा तीव्र विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी फेरतपासणीचे काम सुरू असून, या कामकाजासाठी महापालिका प्रशासनाने ‘ड’ संवर्गातील कामगारांची नेमणूक केली आहे. याला दि म्युनिसिपल युनियनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
याबाबत युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे, की निवडणुकांच्या अनुषंगाने होणाऱ्या मतदार यादीच्या फेरतपासणीसाठी पालिकेतील विविध संवर्गातील कामगारांचा उपयोग करण्यास युनियनला हरकत नाही; मात्र ‘ड’ संवर्गातील कामगारांकडून हे काम करून घेणे योग्य नाही, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
बने यांनी नमूद केले, की मतदार यादी फेरतपासणीचे काम अत्यंत बारकाईने, अचूकता आणि प्रशासकीय जबाबदारीने पार पाडण्याचे असते. अशा प्रकारच्या नाजूक कामकाजासाठी ‘ड’ संवर्गातील कामगारांची नेमणूक करणे व्यवहार्य आणि योग्य नसल्याचे युनियनचे मत आहे.

बळजबरी करू नये!
प्रशासनाने या संवर्गातील कामगारांचा वापर करायचे ठरविल्यास, केवळ इच्छुक कामगारांनाच या कामासाठी नियुक्त करावे आणि इच्छुक नसलेल्या कामगारांवर बळजबरी करू नये, अशी प्रमुख मागणी युनियनने केली आहे. युनियनच्या या भूमिकेमुळे आता पालिका प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com