कार चालवताना सर्रास मोबाईलचा वापर

कार चालवताना सर्रास मोबाईलचा वापर

Published on

कार चालवताना सर्रास मोबाईलचा वापर
ओला, उबरचालकांचा प्रताप, प्रवाशांचा जीव धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : वाहन चालवताना ओला, उबरचालक सर्रास मोबाईलचा वापर करत असल्‍याने अपघाताची भीती प्रवासी व्यक्‍त करीत आहेत. एका मोबाईलवर गुगल मॅप पाहायचे तर, दुसऱ्या मोबाईलवर इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियावर खेळायचे, असा प्रताप सुरू असल्‍याचे प्रवाशांनी सांगितले.
एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईत ओला, उबर या ॲप आधारित टॅक्सीसेवेला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. घरपोच व आरामदायी सेवा असल्याने या कॅबला अधिक पसंती दिली जात आहे. गरजेनुसार वेळेत कॅब उपलब्ध होत असल्याने अनेकांचा प्रवास सुकर झाला आहे.
परिवहन विभागानेही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅप आधारित या टॅक्सीसेवांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ओला, उबर टॅक्सींना ज्या शहरात व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी आवश्यक केली आहे. अ‍ॅपवर आधारित असा स्वतंत्र परवाना घेणे बंधनकारक केले आहे.
मुंबईत कॅबच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन गंभीरतेने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. वाहन चालविताना मोबाईलच नव्हे तर वायर अथवा वायरलेस मोबाईलचा वापर करणे, सिग्नलवर तसेच रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईल हाताळणे गुन्हा आहे; मात्र बहुसंख्य कॅबचालक या नियमांकडे गांभीर्याने पाहतच नाहीत. एका हातात स्टेअरिंग आणि दुसऱ्या हाताने मोबाईल स्क्रोल केला जात आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडीचे कारण देत प्रवासाला नकार
ओला- उबरवर गाडी बुकिंग केल्यानंतर वाहनचालक कोणत्या मार्गांवरून जायचे आहे, असे विचारतात. पनवेलला जायचे असेल तर सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी होते, असे सांगत अटल सेतूवरून जायचे का, असे विचारताच नकार दिल्यास राइड रद्द करतात.

चालकांनी मोबाईल फोन वापरताना किंवा गाडी चालवताना त्यावर काहीतरी पाहत असल्याच्या अनेक घटना आपल्यासमोर आल्या आहेत. याविरोधात आम्ही त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्नही केला. आरटीओकडेही तक्रारी केल्या आहेत.
- के. के. तिवारी,
अध्यक्ष- भाजप रिक्षा-टॅक्सी सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com