‘केईएम’च्या शताब्दीनिमित्त विशेष आवृत्तीचे अनावरण
‘केईएम’च्या शताब्दीनिमित्त विशेष आवृत्तीचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने विशेष आवृत्तीचे अनावरण केले. हे बुकलेट विशेषत: नव्याने रुजू होणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते करण्यात आले.
केईएमच्या १०० वर्षांच्या वारशात हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. नवीन निवासी डॉक्टरांसाठी विचारपूर्वक आणि समर्पकरीत्या तयार केलेले बुकलेट प्रथमच प्रकाशित होत आहे. हे बुकलेट रेसिडेन्सीच्या प्रवासाची सुरुवात करताना त्यांचे पहिले सहचर ठरेल, केईमची संस्कृती, कार्यपद्धती टीमवर्कची भावना आणि रुग्णालयाची ओळख समजून घेण्यास मदत करेल. ही विशेष आवृत्ती केवळ माहितीपुरती मर्यादित नाही. तुम्ही एकटे नाही, इथे कशी सुरुवात करायची, काय अपेक्षित आहे आणि आम्ही आमच्या अनुभवातून काय शिकलो, अशी जवळीक निर्माण करणारी आहे. यामध्ये केईएममधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव, मार्गदर्शन, उपयुक्त माहिती आणि निवासी डॉक्टरांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू एकत्रित करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन निवासी डॉक्टरांना त्यांच्या भूमिकेत आत्मविश्वास, स्पष्टता आणि आधार मिळेल, असे सांगण्यात आले.
...
नवीन बॅचचे स्वागत
केईएम मार्ड म्हणून आम्ही आमच्या निवासी डॉक्टरांच्या प्रत्येक आव्हानात आणि प्रत्येक यशात ठामपणे त्यांच्यासोबत उभे आहोत. या शताब्दी विशेष बुकलेटद्वारे आम्ही नवीन बॅचचे मनापासून स्वागत करीत आहोत, असे केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. अमर अगमे यांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

