अतिरिक्त शिक्षक समायोजनाला स्थगिती
अतिरिक्त शिक्षक समायोजनाला स्थगिती
शिक्षण आयुक्तांचा निर्णय; कमी पटसंख्येच्या शाळांवर संकट कायम
मुंबई, ता. ३० : राज्यात सध्या सुरू असलेल्या संच मान्यतेच्या प्रक्रियेनंतर राज्यभरातील सुमारे १५ हजारांहून अधिक शाळांत शेकडो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ची संच मान्यता केली जाणार आहे. त्यानुसार २० नोव्हेंबरला शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शिक्षक समायोजनाच्या आदेशाला शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्थगिती दिली आहे.
आयुक्तांनी दिलेल्या या स्थगितीचे राज्यातील शिक्षक संघटनांनी स्वागत केले असले तरी संच मान्यतेची प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातून पटसंख्या कमी होणाऱ्या शाळांचे संकट कायम आहे. त्याविरोधात ५ डिसेंबरला शिक्षक सेना, शिक्षण क्रांती संघटना, मुख्याध्यापक संघटनांनी शाळा बंद ठेवण्याचा सरकारला इशारा दिला आहे. काही संघटनांनी नागपूर येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.
शिक्षण आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात २०२५-२६च्या ऑनलाइन संच मान्यतेबाबत पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने तसेच २०२४-२५मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया डिसेंबर २०२५मध्ये राबविणे आणि २०२५-२६च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रिया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुन्हा करावी लागणार आहे. यामुळे समायोजनाची प्रक्रिया पुन्हा राबविण्याऐवजी २०२५-२६ची संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याचे सांगत आयुक्तांनी शिक्षकांच्या समायोजनाच्या निर्णय प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यासाठी शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरूनही ही प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

