कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा
कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा
वैद्यकीय अधीक्षकांचे शिव आरोग्य सेनेला आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासह रुग्णालयातील समस्या, अडीअडचणी दूर करण्यात येतील, असे आश्वासन कस्तुरबा रुग्णालयाच्या नवनिर्वाचित वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद लावंड यांनी दिले आहे.
डॉ. लावंड यांची कस्तुरबा रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिव आरोग्य सेनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. शिवसेना (ठाकरे गट) शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत शिव आरोग्य सेनेच्या वतीने कस्तुरबा रुग्णालयात गोरगरिबांना सातत्याने मदत करणाऱ्या व नुकत्याच पदोन्नती मिळालेल्या नवनिर्वाचित प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवनंदा लावंड यांना भेटून रुग्णालयात रुग्णांना येणाऱ्या अडीअडचणी बद्दल चर्चा करण्यात आली. या वेळी शिव आरोग्य सेनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर पदोन्नतीबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी शिव आरोग्य सेना मुंबई सचिव ज्योती भोसले, शिवडी विधानसभा समन्वयक अनंत कोटकर, दादर विधानसभा समन्वयक अमोल बोरकर, वडाळा विधानसभा समन्वयक रोहित पडवळ, नालासोपारा विधानसभा सहसमन्वयक चिमन सोलंकी, नालासोपारा सहसंघटक मनोज खरात, सिस्टर इन्चार्ज विद्या साखरकर, भायखळा विधानसभा संघटक राजा झगडे, बाळकृष्ण गुरव, गुलाब ठाकूर, अशोक गवळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

