

ओशिवरामध्ये ११ मजली प्रसूतिगृह
इमारतीत अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थानही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : ओशिवरा येथील अजित ग्लास फॅक्टरीच्या जवळील ओशिवरा प्रसूतिगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, या ठिकाणी ११ मजल्यांची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानही असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रस्तूतिगृहांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे. काही जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन उभारण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेची २७ प्रसूतिगृहे व एक माता बाल हॉस्पिटल मागाठाणे येथे सुरू आहे. यापैकी ओशिवरा, मरोळ, सावित्रीबाई फुले भांडुप, डॉ. आनंदीबाई जोशी कुर्ला या प्रसूतिगृहांचा सेंटीनल सेंटर म्हणून विकास करण्यात आला आहे. त्याशिवाय येथे विशेष नवजात शिशुविभाग सुरू करण्यात आला आहे. सर्व प्रसूतिगृहांतील सेवांचा दर्जा व कामगिरी सुधारण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत परिचारिका, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ओशिवरा येथील प्रसूतिगृहाचे आराखडे महापालिका वास्तुशास्त्रज्ञ यांनी आवश्यकतेनुसार तयार केले आहेत. आराखड्यानुसार तळघर तळमजला व त्यावर ११ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. पुनर्विकास करण्यात येणारे या प्रसूतिगृहामध्ये १५२ खाटा उपलब्ध होणार असून, इमारतीमध्ये १०व्या व ११व्या मजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान राहणार आहे. यात डॉक्टरांचाही समावेश आहे.
...
सल्लागाराची नियुक्ती
प्रसूतिगृहाच्या पुनर्विकासासाठी संरचनात्मक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सल्लागाराने निविदा मागविण्यासाठी संरचनात्मक आराखडा तयार करणे, संरचनात्मक अंदाजपत्रके बनविणे, निविदा प्रपत्र तयार करणे, बांधणी काळात स्थळाचे पर्यवेक्षक व तांत्रिक सल्ला देणे, काम पार पाडण्यासाठी कार्यकारी आराखडा तयार करणे, काम पूर्ण झाल्यानंतर समाप्ती पत्र वितरित करणे, काम पूर्ण झाल्यानंतर संरचना स्थिरता प्रमाणपत्र देणे, आधी कामे सल्लागाराला करावी लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.