बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा मार्ग

बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा मार्ग

Published on

बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा मार्ग
एड्स दिनानिमित्त ‘स्वयम् मेळा’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने सोमवारी (ता. १) ‘स्वयम् मेळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. मुंबईतील एआरटी केंद्रांमधून उपचार घेणाऱ्या सुमारे १२० महिलांनी या उपक्रमात भाग घेतला.
‘स्वयम् मेळ्या’चे हे पाचवे वर्ष असून, एआरटी केंद्रांतील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र या मेळ्यात दिसून आले. रांगोळी, पाककृती, नृत्य, फॅशन शो, कलाकौशल्य अशा विविध स्पर्धांमधून महिलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. ‘आयुष्यावर बोलू काही’ या विशेष स्पर्धेत एचआयव्हीसह जगण्याचे अनुभव, सामाजिक आव्हाने आणि त्यावर केलेली मात याबाबत महिलांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. विक्री दालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच एबीएचए व पीएमजयसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी हेल्पडेस्कही कार्यरत होते. या वेळी एआरटी औषधोपचाराचे सातत्य, गुप्तरोग, एचआयव्ही/एड्स कायद्याच्या तरतुदी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एआरटी केंद्रांतील महिलांनी बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा विकास साधावा, असे मत अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय करंजकर व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com