पोक्सो कायद्याविषयी महापालिकेच्या शाळांमध्ये जनजागृती
पोक्सो कायद्याविषयी महापालिकेच्या शाळांमध्ये जनजागृती
‘अभया’ या विशेष नाटिकेद्वारे मुला-मुलींमध्ये कायद्याचे प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील महापालिका शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींना पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमासाठी ‘अभया’ या विशेष नाटिकेचा आधार घेण्यात आला.
संवादात्मक पद्धतीने सादर केलेल्या या नाटिकेद्वारे सुरक्षितता, आत्मसंरक्षण, गैरवर्तन ओळखणे, योग्य प्रतिक्रिया, तक्रार नोंदविण्याची जबाबदारी आणि उपलब्ध कायदेशीर संरक्षण याबद्दल माहिती देण्यात आली. मुलांना आणि मुलींना शालेय शिक्षण देत असताना त्यांना लैंगिक शिक्षण देणेही तितकेच गरजेचे आहे. हीच बाब अधोरेखित करून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पोक्सो कायद्याविषयी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच, प्रसंगावधान राखणे, न घाबरता परिस्थितीचा सामना करणे अशा विविध स्व-संरक्षणाबाबत तसेच पोक्सो कायद्याबाबत अभया नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मीना नाईकस् क्रिएटिव्ह वर्कशॉप संस्थेमार्फत अभया ही नाटिका सादर करण्यात येत आहे. या नाटिकेला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मुलांमध्ये ‘लैंगिक समानता आणि आदर’ याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. जेणेकरून मुलेही लैंगिक असमानतेचे नकारात्मक परिणाम समजून घेतील आणि महिलांचा आदर करण्यास शिकतील. यासाठी मुलांमध्येही जनजागृती करण्यात आली.
२५ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबर २०२५ पर्यंत या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत अभया नाटिकेचे १९ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहे. उर्वरित प्रयोगांचे सादरीकरण हे नियोजित वेळेनुसार करण्यात येणार आहे. सदर नाटिकेमार्फत एकूण १० ते १२ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. पुढील नियोजनात चार हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये या नाटिकेद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

