बांधकाम साईटवरील ३८ मजुरांना मलेरिया
बांधकाम साइटवरील ३८ मजुरांना मलेरिया
चार वर्षांतील सर्वाधिक नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महानगरातील विविध बांधकाम साइटवरील ३८ मजुरांमध्ये यावर्षी मलेरियाचे निदान झाले असून, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत हा सर्वाधिक आकडा आहे. महापालिकेच्या वर्षातून दोनदा होणाऱ्या प्रोअॅक्टिव्ह स्क्रीनिंगमुळे रुग्णांची वेळेवर ओळख होत असून, त्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मलेरियाच्या रुग्णसंख्येत मुंबई राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहते. बांधकाम साइटवर पाणी साठवले जाणे, स्क्रॅपचा साठा असणे आणि बाहेरून आलेल्या मजुरांची मोठी संख्या यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमित स्क्रीनिंग सुरू केले. यासंदर्भात तुषार भोसले यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नानंतर महापालिकेने गेल्या चार वर्षांचा तपशील जाहीर केला. महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, ‘‘मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे बाहेरून येणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. हा गट मलेरियाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने आम्ही प्रोअॅक्टिव्ह स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. स्क्रीनिंग वाढल्यामुळे रुग्णसंख्या अधिक स्पष्टपणे दिसत असली तरी प्रतिबंध, तपासणी आणि उपचार या सर्व पायऱ्यांवर आम्ही अधिक कडकपणे काम करत आहोत.’’
...
कोणत्या वर्षी किती?
२०२२ मध्ये ३९,७२५ मजुरांची तपासणी करण्यात आली आणि त्यात १७ रुग्ण आढळले. २०२३ मध्ये ८५,४२५ तपासण्यात आले १७ संक्रमित आढळले. २०२४ मध्ये ५८,२९० पैकी १७ जणांना मलेरिया असल्याचे आढळले. यावर्षी तब्बल १,०१,३२८ मजुरांची तपासणी केली गेली. त्यात ३८ जणांमध्ये मलेरियाचे निदान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

