मुंबई महापालिकेला कंट्रोल, बॅलेट युनिट प्राप्त

मुंबई महापालिकेला कंट्रोल, बॅलेट युनिट प्राप्त

Published on

मुंबई महापालिकेला कंट्रोल, बॅलेट युनिट प्राप्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीकरिता २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट पालिकेला प्राप्त झाली आहेत. या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील महापालिकेच्या गोदामांत कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेवेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेसाठी एकूण २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिटचे वितरण केले आहे. प्राप्त झालेल्या या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील महापालिकेच्या गोदामांत करण्यात आली आहे. महापालिकेच्या गोदामांत सामग्रीची साठवणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी टप्पेनिहाय आखणी करण्यात आली आहे. महत्त्वाचा टप्पा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता होय. हा टप्पा आता पूर्ण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com