हाफकिनमध्ये लस प्रशिक्षण

हाफकिनमध्ये लस प्रशिक्षण

Published on

हाफकिनमध्ये लस प्रशिक्षण

मुंबई, ता. १ : संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्प सेवा कार्यालयाने (यूएनओपीएस) मेसर्स टेकइन्व्हेन्शन लाइफकेअरमार्फत इथिओपियातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि लस तज्ज्ञांचे शिष्टमंडळ परळ येथील हाफकिन शिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेला लस विश्लेषणावरील विशेष प्रशिक्षणाकरिता भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे.
इथिओपियाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार हैलू अशेनाफी डेनिसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. त्यांनी संस्थेतील संशोधन उपक्रम, नवोन्मेषी प्रकल्प आणि भविष्यातील संयुक्त सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com