मुंबईसह नंदुबारमध्ये ईडीचे छापे
मुंबईसह नंदुबारमध्ये ईडीचे छापे
मुंबई, ता. १ : आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईसह नंदुरबार येथील जामिया इस्मालिया इशातूल उलूम ट्रस्ट आणि येमेनचा नागरिक अल-खदामी खालिद इब्राहिम सालेह याच्याशी संबंधित सुमारे १२ ठिकाणांवर छापेमारी केली. परकीय निधी नियमन कायद्याचे उल्लंघन करून जामिया इस्लामिया ट्रस्ट आणि सालेह यांनी परदेशातून आलेली आर्थिक रसद नोंदणी नसलेल्या संस्था आणि ट्रस्टमध्ये वळविल्याचा आरोप असल्याचे ईडीच्या प्रवक्त्याने सांगितले. याप्रकरणी गेल्या वर्षी राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावरून हे आरोप स्पष्ट झाले होते. त्यानंतर ईडीने याप्रकरणी समांतर तपास सुरू केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

