अडलेल्या गर्भवतीची पोलिसांकडून प्रसूती

अडलेल्या गर्भवतीची पोलिसांकडून प्रसूती

Published on

अडलेल्या गर्भवतीची पोलिसांकडून प्रसूती
डोंगरीच्या पथकाचे सर्वत्र कौतुक

मुंबई, ता. २ ः धारावीतील गर्भवती डोंगरी येथे आली असता तिला अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्यावर प्रसंगावधान दाखवत डोंगरी पोलिसांनी रस्त्यात तिची सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर पोलिस पथकाने बाळ-बाळंतिणीला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. अचानक घडलेल्या या घटनेत पोलिस पथकाने दाखवलेले प्रसंगावधान, माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धारावीत राहणाऱ्या माला नाडर (वय ३५) शनिवारी पतीसोबत डोंगरी परिसरात आल्या होत्या. अचानक त्यांना प्रसूतिकळा सुरू झाल्या. डॉक्टरांनी दिलेल्या मुदतीआधीच अचानक कळा सुरू झाल्याने माला आणि त्यांचे पती भांबावून गेले. कळा असह्य होत्या. माला यांना चालणे किंवा वाहनात बसून रुग्णालयात जाणे अशक्य होते. त्या पदपथावर बसल्या. त्यांची अवस्था पाहून पादचाऱ्यांनी डोंगरी पोलिसांना कळवले. डोंगरी पोलिस ठाण्यातून महिला पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोबत आलेल्या पुरुष पोलिसांनी स्थानिक रहिवाशांकडून साडी, चादर आणि प्रसूतीसाठी अन्य आवश्यक वस्तू क्षणार्धात उपलब्ध करून घेतल्या. माला पुढल्या काही क्षणात प्रसूत होतील, हा अंदाज घेत महिला पोलिसांनी चादर, साड्यांचा आडोसा तयार केला. माला तेथेच प्रसूत झाल्या. त्यांनी सुदृढ बालकाला जन्म दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com