महापरिनिर्वाण दिनासाठी पश्चिम रेल्वे सज्ज

महापरिनिर्वाण दिनासाठी पश्चिम रेल्वे सज्ज

Published on

महापरिनिर्वाण दिनासाठी पश्चिम रेल्वे सज्ज
सुरक्षा, सुविधांवर भर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानक आणि चैत्यभूमीकडे होणाऱ्या गर्दीचा विचार करून पश्चिम रेल्वेने व्यापक सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असल्याने दादर परिसरात विशेष सतर्कता बाळगली जात आहे.
दादर स्थानकात ७०० जीआरपी आणि आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, प्रवेशद्वार आणि स्टेशन परिसरात २४ तास गस्त ठेवली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पथके सज्ज आहेत. स्थानकातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १६० सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय करण्यात आले आहेत. फेस रेकग्निशन प्रणाली, पीपल डेन्सिटी अ‍ॅनालिसिस, लेफ्ट ओव्हर लगेज डिटेक्शन आणि लाइन क्रॉसिंग अलर्ट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. अनुयायांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी २४ तास कार्यरत हेल्पडेस्क उभारण्यात आला आहे. येथे आरपीएफ, जीआरपी आणि तिकीट तपासणी पथके तैनात आहेत. आरपीएफ डॉग स्क्वॉड, क्विक रिस्पॉन्स टीम आणि जीआरपी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडही गस्तीत आहेत.
...
वैद्यकीय मदत
दादर स्टेशन तसेच टिळक पुलाच्या परिसरात गर्दीचा ओघ नियंत्रित करण्यासाठी महापालिकेच्या मदतीने पादचारी मार्गांची रस्सीने विभागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर आणि रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छता, प्रकाशयोजना आणि जमाव व्यवस्थापनाबाबत सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com