कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञान शिष्टमंडळाची मुंबईतील प्रमुख प्रकल्पांना भेट

कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञान शिष्टमंडळाची मुंबईतील प्रमुख प्रकल्पांना भेट

Published on

कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञान शिष्टमंडळाची मुंबईतील प्रमुख प्रकल्पांना भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कॅनडातील बोगदा तंत्रज्ञान शिष्टमंडळाने मुंबईतील तीन महत्त्वाचा प्रकल्पांची, मुंबई किनारी रस्ता (दक्षिण), मुंबई किनारी रस्ता (उत्तर) आणि गोरेगाव– मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) माहिती घेतली. महानगरपालिका मुख्यालयात सादरीकरणाद्वारे या प्रकल्पांमधील तांत्रिक बाबींचा आढावा देण्यात आला.

किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात वापरण्यात आलेली ‘सकॉर्डो’ वायुवीजन प्रणाली भारतात प्रथमच वापरली जात आहे. दोन भूमिगत बोगद्यांच्या बांधकामातील आव्हाने, भविष्यात सेन्सर्स बसवण्याच्या शक्यता अशा मुद्द्यांवर शिष्टमंडळाने चर्चा केली. शिष्टमंडळाने जीएमएलआर आणि किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पांसंबंधी पर्यावरणीय परवानग्या व तांत्रिक प्रक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाला भेट देऊन बोगदे, आंतरमार्गिका आणि वॉकवेची पाहणी करत प्रकल्पाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com