शीव (सायन) उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करा -

शीव (सायन) उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करा -

Published on

शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करा
अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.२ : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा वेग वाढवत ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलली आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज (ता.२) घेतलेल्या सविस्तर आढावा बैठकीत उड्डाणपूल ३१ मे २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीला पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, महापालिकेचे आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रलंबित तांत्रिक अडचणी आणि वेगवेगळ्या विभागांकडील प्रलंबित मंजुऱ्या यावर चर्चा झाली. कामांच्या गतीबाबत समाधान व्यक्त करताना बांगर यांनी यापुढील प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश दिले.नागरिकांना होणारी असुविधा कमी करण्यासाठी महापालिका– रेल्वे– वाहतूक पोलिस यांच्यात आणखी प्रभावी समन्वय आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळ्ये आणि मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला आदी या बैठकीस उपस्थित होते.

या प्रकल्पातील तुळया नागपूर आणि अंबाला येथे तयार होत आहेत. कामात विलंब होऊ नये म्हणून महापालिकेचे प्रतिनिधी दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी तैनात राहतील, फॅब्रिकेशनची गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठ्याची देखरेख करतील, अशी माहिती बांगर यांनी दिली. सर्व टप्पे निर्धारित वेळेनुसार पूर्ण झाल्यास उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल आणि १ जून २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला करता येईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. बांगर पुढे म्हणाले की, “प्रकल्पातील प्रत्येक विलंबामुळे हजारो नागरिकांना हाल सोसावे लागतात. त्यामुळे सर्व विभागांनी प्रामाणिकपणे काम करून हा महत्त्वाचा दुवा निश्चित मुदतीत सुरू करावा.”
.........
पालिकेचा प्राधान्य प्रकल्प
शीव (सायन) उड्डाणपूल हा पूर्व-पश्चिम दळणवळणाचा महत्वाचा भाग असून, त्याचे लवकर पूर्ण होणे हे संपूर्ण मध्य मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. महापालिका प्रशासनाचा हा प्राधान्य प्रकल्प असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com