बाईक टॅक्सी अपघात प्रकरण

बाईक टॅक्सी अपघात प्रकरण

Published on

प्रवाशाच्या मृत्यूनंतर उबरसह संचालकाविरुद्ध गुन्हा
बाइक टॅक्सी अपघात प्रकरण

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर बेकायदा बाइक टॅक्सी आणि काँक्रीट मिक्सरच्या धडकेत एका महिला प्रवाशाने जीव गमावल्यानंतर मुलुंडच्या नवघर पोलिसांनी उबर इंडिया सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरोधात सोमवारी गुन्हा नोंदवला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन विभागाच्या तक्रारीआधारे केल्याचे सांगण्यात आले.

असा झाला अपघात
२९ नोव्हेंबर रोजी पूर्व द्रुतगती मार्गावरील ऐरोली उड्डाणपुलाखाली भरधाव काँक्रीट मिक्सरने बाइक टॅक्सीला धडक दिली. त्यात प्रवासी शुभांगी सुरेन्द्र मगरे(४९) यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गणेश माधव (३२) गंभीर जखमी झाला. त्यास जबाबदार धरत पोलिसांनी मिक्सरचालकास अटक केली होती.

चालक, उबरकडून नियमभंग
चालक गणेशने जी दुचाकी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली त्याची उबर कंपनीकडे नोंदणी नव्हती. त्याचे मामा शेखर चव्हाण यांच्या नावे असलेली ॲक्टिव्हा दुचाकीची कंपनीकडे नोंदणी होती; मात्र ती दुचाकीही खासगी असल्याने त्यावरून प्रवासी वाहतूक शक्य नाही. त्यामुळे कंपनीने विनापरवाना या दुचाकीची ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी करून घेतल्याचा दावा आरटीओने तक्रारीत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com