आरोपी अनंत गर्जेवर होणार न्यायवैद्यक चाचण्या

आरोपी अनंत गर्जेवर होणार न्यायवैद्यक चाचण्या

Published on

अनंत गर्जेची न्यायवैद्यक चाचणी
पोलिसांची माहिती; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, ता. २ : डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणातील अटक आरोपी अनंत गर्जेवर न्यायवैद्यक, मानसशास्त्रीय चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती मंगळवारी वरळी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात दिली. दरम्यान, न्यायालयाने अनंतला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपी गर्जे मृत डॉ. गौरी यांचा पती असून, मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे. गेल्या आठवड्यात वरळी पोलिसांनी डॉ. गौरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली. डॉ. गौरी यांच्या पालकांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप केला. त्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत. घटनेवेळी डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या, आपण बाहेरून घरी आलो, दार उघडत नसल्याने इमारतीबाहेरून घरात शिरलो, ही अनंतचे दावे खरे की खोटे हे स्पष्ट करण्यासाठी न्यायवैद्यक, मानसशास्त्रीय चाचण्या करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले.
--------
प्रेयसीचा जबाब नोंदवला
पोलिसांनी अनंतच्या प्रेयसीचा जबाब नोंदवला. त्यात तिने गेल्या तीन वर्षांपासून अनंतच्या संपर्कात नसल्याचे सांगितले. या महिलेच्या प्रसूती संदर्भातील कागदपत्रे डॉ. गौरी यांच्या हाती लागली होती. त्यात या महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे नोंद होते. त्या कागदपत्रांवरून डॉ. गौरी आणि अनंत यांच्यात वाद झाले होते, असा आरोप डॉ. गौरी यांच्या वडिलांनी जबाबात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com