एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद

एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद

Published on

एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद
सहा महिन्यांत  १९.२४ कोटींची कमाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘पॅकेज टूर’ उपक्रमाने अवघ्या सहा महिन्यांत यशाचा नवा इतिहास रचला आहे. एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात तब्बल ४,०३९ पॅकेज टूर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या. या कालावधीत एसटीच्या बस सुमारे २६.९७ लाख किलोमीटर धावल्या आणि त्यातून १९.२४ कोटींचे उत्पन्न मिळाले.
सांगली विभागाने ५८१ टूरसह अव्वल स्थान पटकावले, तर कोल्हापूर (५६१), सातारा (३९१), अहिल्यानगर (३६२) आणि पुणे (२८८) हे विभागही आघाडीवर राहिले. महसुलाच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने ३.२५ कोटींच्या उत्पन्नासह बाजी मारली, तर अहिल्यानगर (२.४५ कोटी), सांगली (२.३५ कोटी), सातारा (२.११ कोटी) आणि पुणे (१.३६ कोटी) या विभागांनीही भरघोस महसूल मिळवला. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व जालना, तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ या विभागांमध्येही पॅकेज टूरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही  योजना सुरू झाली होती.
...
 पर्यटनाला नवे पंख
पॅकेज टूर सेवेमुळे एकीकडे राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, दुसरीकडे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात अधिक नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पॅकेज टूर सुरू करण्याचे संकेतही महामंडळाकडून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com