शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Published on

शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मुंबई, ता. २४ : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) आपली कंबर कसली असून, बुधवारी ५० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रचाराचे नेतृत्व करणार असून, नगर परिषदांमधील घवघवीत यशानंतर आता महापालिकांमध्येही ‘विकासाचा अजेंडा’ घेऊन शिवसेना मतदारांसमोर जाणार आहे.

शिवसेनेच्या या यादीत ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, दीपक केसरकर, शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत या मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही प्रचाराची मोठी धुरा सोपवण्यात आली आहे.


​नगर परिषदेच्या विजयाचा उत्साह नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश संपादन केले आहे. पक्षाचे ६२ हून अधिक नगराध्यक्ष आणि ८५० हून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या यशामुळे पक्षात सध्या कमालीचे उत्साही वातावरण आहे. हाच विजयी संकल्प महापालिका निवडणुकीत कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर असेल. विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. प्रचारादरम्यान राज्य सरकारने राबवलेल्या जनहितार्थ योजना आणि पायाभूत सुविधांचा विकास हे मुद्दे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.​ या यादीत आशीष जयस्वाल, योगेश कदम यांसारख्या तरुण आमदारांनाही स्थान देण्यात आले असून, राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com