व्यवस्था परिवर्तनाची लढाई सुरूच

व्यवस्था परिवर्तनाची लढाई सुरूच

Published on

व्यवस्था परिवर्तनाची लढाई सुरूच
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ‘१५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण व्यवस्था परिवर्तनाची लढाई अद्याप सुरूच आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले आहे. या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून, तो काँग्रेसचा विचार आहे, त्यांची नितांत गरज आहे,’ असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यालय टिळक भवन येथे रविवारी (ता. २८) झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, राजन भोसले, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, श्रीरंग बरगे, जोजो थॉमस यांच्यासह सेवादल व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सपकाळ म्हणाले, की १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण व्यवस्था परिवर्तनाची लढाई अद्याप सुरूच आहे. राजसत्ता व धर्मसत्ता मूठभर लोकांच्याच हातात असावी, हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार असून, हा देश सर्वांचा आहे. सत्ता, संपत्तीवर सर्वांचा अधिकार आहे, हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. काँग्रेसचा विचार संविधानाचा विचार आहे. तर भाजपच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान आहे, स्पृश्य-अस्पृश्यतेचा विचार आहे. या विचाराविरोधात काँग्रेसचा विचार आहे. आपल्या विचाराला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘मनरेगा’ बचाव अभियानाची शपथ दिली.

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदा, नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ओजस्वी यश मिळाले आहे. सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड पैसा, प्रशासन, निवडणूक आयोगाची मदत व दडपशाही होती; पण त्यासमोर काँग्रेसचा कार्यकर्ता झुकला नाही, दबला नाही तर ताठ मानेने उभा राहिला. हाच बाणा कायम ठेवा. ‘लढेंगे और जितेंगे’ असा निर्धार कायम ठेवा.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com