ठाकरेंच्या प्रचारासाठी जम्मू काश्मीरचे शिवसैनिक येणार

ठाकरेंच्या प्रचारासाठी जम्मू काश्मीरचे शिवसैनिक येणार

Published on

ठाकरेंच्या प्रचारासाठी जम्मू-काश्मीरचे शिवसैनिक येणार
दोन्ही बंधूंच्या युतीचे स्‍वागत
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २९ : जम्मू-काश्मीरमधील ठाकरेंचे शिवसैनिक थेट मुंबईच्या रणांगणात प्रचारासाठी उतरणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्र आल्याने देशभरातील शिवसैनिकांनी याचे स्‍वागत केले आहे. जम्मू-काश्मीरमधील शिवसैनिकही युतीमुळे आनंदित आहेत.
​जम्मू येथील शिवसेना प्रदेश मध्यवर्ती कार्यालयात ठाकरे बंधू एकत्र आल्याने मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रदेशाध्यक्ष मनीश साहनी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष केला. ​या वेळी मनीश साहनी म्हणाले की, या ऐतिहासिक युतीला पाठबळ देण्यासाठी आणि विजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत प्रचारासाठी जाणार आहेत.
मुंबईतील निवडणुकीत ठाकरे ब्रँडची ताकद वाढवण्यासाठी आम्ही मैदानात उतरू. ​महाराष्ट्र आणि अखंड महाराष्ट्राच्या हितासाठी असलेल्या वचनबद्धतेमुळेच ठाकरे बंधू तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे ते म्‍हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता जम्मू-काश्मीरमधील शिवसैनिकांच्या सहभागामुळे एक वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com