​मुंबई वाचली पाहिजे, एकजुटीने लढा!

​मुंबई वाचली पाहिजे, एकजुटीने लढा!

Published on

​मुंबई वाचली पाहिजे, एकजुटीने लढा!
राज ठाकरेंनी फुंकले रणशिंग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : ‘‘जागावाटपाचा तिढा बाजूला ठेवा, मुंबई वाचवण्यासाठी आता एकजुटीने मैदानात उतरा,’ असा आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. दोन दशकांचा दुरावा संपवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मुंबई महापालिकेच्या रणांगणात एकत्र आले आहेत. या ऐतिहासिक युतीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील ‘रंगशारदा’मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विजयाचा हुंकार भरला.
​शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीमध्ये जागांच्या आकड्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे संकेत देत राज ठाकरे म्हणाले, ‘‘कुणाला किती जागा मिळाल्या हे मोजत बसू नका. मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी हे जागावाटप अत्यंत क्षुल्लक आहे. आपण गाफील राहिलो तर मुंबई कायमची हातातून जाईल. शत्रूचे मनसुबे गाडण्यासाठी आता दोन पावले मागे येऊन एकजुटीने लढावे लागेल.’’ ​राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा लावून धरला. ‘‘आज ईव्हीएम आणि मोदी आहेत म्हणून त्यांचा माज सुरू आहे; पण लक्षात ठेवा, आपल्याकडे सत्ता नसली तरी आपला दबदबा आजही कायम आहे. या सत्तेच्या माजाला आता मतदानातून उत्तर द्यावे लागेल,’’ असे ते म्हणाले.
...
पुराव्यासकट कारनामे...
​उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश देताना राज ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला, ‘‘आज केवळ फॉर्म भरा आणि प्रचाराला लागा. ही तर फक्त सुरुवात आहे; प्रत्यक्ष प्रचारसभेत मी विरोधकांचे सर्व कारनामे पुराव्यासकट चव्हाट्यावर आणणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com