भांडुपमध्ये सर्वपक्षीय बंडखोरी?
भांडुपमध्ये सर्वपक्षीय बंडखोरी?
मुंबई, ता. २९ : भांडुपमध्ये उमेदवारी मिळण्याची आशा धूसर होताच भाजपसह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षातील इच्छुक बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. पक्षाकडून समजूत न काढली गेल्यास ही राजकीय मंडळी मंगळवारी अखेरच्या दिवशी अपक्ष अर्ज भरतील, असे कळते.
संभाव्य बंडखोरीत भाजपचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, मनसे उपाध्यक्ष व माजी नगरसेविका अनिशा माजगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळवी यांचा समावेश आहे. दहितुले यांनी भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११३ येथून दावा केला होता. मात्र येथून शिवसेना आमदार अशोक पाटील आपल्या मुलासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या लढतीत या प्रभागातून शिवसेनेच्या दीपमाला बढे यांनी मोठ्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. फाटाफुटीनंतर त्या उद्धव ठाकरे गटात आहेत. या पार्श्वभूमीवर हा प्रभाग भाजपला सुटावा, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती; मात्र आमदार पाटील यांच्या हट्टापायी हा प्रभाग शिवसेनेला सुटेल, असा अंदाज आहे. ‘‘माझा विरोध पक्ष, युतीला नाही तर आमदार पुत्राच्या उमेदवारीला आहे, घराणेशाहीला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार झालाच पाहिजे, ही माझी भूमिका आहे,’’ असे भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी सांगितले.
शेजारील प्रभाग क्रमांक ११४ ठाकरे सेनेला सुटेल, हे जवळपास निश्चित झाल्याने मनसे उपाध्यक्षा माजगावकर यांनीही अन्य पक्षातर्फ रिंगणात उतरण्याऐवजी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रभागातून ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजोल यांचे नाव चर्चेत आहे; मात्र त्यांना स्थानिक आणि निष्ठावंत ठाकरे सैनिकांचा विरोध आहे. ‘‘गेल्या लढतीत मी आठ हजारांहून अधिक मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते. या प्रभागात माझा संपर्क दांडगा आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे माझ्या उमेदवारीबाबत अनुकूल असूनही वाटाघाटीत प्रभाग ठाकरे सेनेला सुटल्याने हा निर्णय घेतला, असे माजगावकर यांनी सांगितले.
...
दीपक साळुंखे बंडखोरीच्या भूमिकेत
येथील प्रभाग क्रमांक १०९ येथून राष्ट्रवादीने (अजित पवार) अनपेक्षितपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सज्जू मलिक यास उमेदवारी जाहीर केल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत. मलिक आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांची जवळीक सर्वश्रुत असून, त्यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरविल्याने सर्वसामान्य मतदारांच्याही भुवया उंचावल्या आहेत. पक्षाच्या या निर्णयामुळे येथून इच्छुक दीपक साळुंखे बंडखोरीच्या भूमिकेत आहेत. ‘‘निष्ठावंत असूनही नाकारल्याने अपक्ष निवडणूक लढणार आहे,’’ असे दीपक साळुंखे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

