भायखळ्यात दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बाद

भायखळ्यात दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बाद

Published on

भायखळ्यात दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बाद

मुंबई, ता. ३१ : भायखळ्यातील प्रभाग क्रमांक २११ आणि २१२ मध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून बाद झाले आहेत. त्यामुळे येथे भाजप वगळून इतर पक्षांमध्ये लढत होईल. प्रभाग क्रमांक २११ मधून भाजपचे शकील अन्सारी, तर प्रभाग क्रमांक २१२ मधून मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज कागदपत्रांच्या छाननीत बाद झाला, तर खामकर यांना उमेदवारी अर्ज वेळेत सादर करता न आल्याने निवडणुकीतून बाहेर पडावे लागले आहे. प्रभाग क्रमांक २१२ मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळण्यास विलंब झाल्यामुळे अर्ज सादर करता आला नाही. या प्रभागात ‘अभासे’च्या गीता गवळी, मनसेच्या श्रावणी हळदणकर आणि काँग्रेसच्या नाजिया सिद्दीकी यांच्यात लढत होणार आहे. मागील निवडणुकीत याच प्रभागातून गीता गवळी विजयी झाल्या होत्या.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २११ मधून यंदा काँग्रेसकडून खान मोहम्मद वकार अन्सारी, तर समाजवादी पक्षाकडून एजाज अहमद खान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे शकील अन्सारी यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने येथेही भाजपला मोठा धक्का बसला आहे. मागील निवडणुकीत या प्रभागातून समाजवादी पक्षाचे रईस शेख विजयी झाले होते. ते सध्या आमदार आहेत. भाजपचे दोन्ही उमेदवार बाद झाल्याने भायखळ्यातील या दोन प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com