मुंबईत छाननीअंती १६७ अर्ज बाद

मुंबईत छाननीअंती १६७ अर्ज बाद

Published on

मुंबईत छाननीअंती १६७ अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : महापालिका निवडणुकीसाठी प्राप्‍त दोन हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची आज (ता. ३१) छाननी करण्‍यात आली. यापैकी १६७ नामनिर्देशनपत्रे छाननीत अवैध ठरली, तर उर्वरित दोन हजार २३१ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर शनिवार, ३ जानेवारीला सकाळी ११ वाजेपासून वैध उमेदवारांना निवडणूक चिन्‍हांचे वाटप करण्‍यात येणार आहे.
काल (ता. ३०) रोजी म्‍हणजेच नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत एकूण मिळून दोन हजार ५१६ अर्ज प्राप्‍त झाले होते. आज (ता. ३१) रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सर्व २३ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयांमध्‍ये नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया राबविण्‍यात आली. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, अर्जाचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही, यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. ज्यांचे अर्ज परिपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज वैध ठरवून अंतिम करण्यात आले.
...
प्रभागानुसार वैध अर्ज अवैध अर्ज
१) ए + बी + ई विभाग - १४८ / २
२) सी + डी विभाग - ४९ / ०३
3) एफ दक्षिण विभाग - ७१ / ०२
४) जी दक्षिण विभाग - ६५ / ०८
५) जी उत्तर विभाग - १२७ / ०४
६) एल विभाग - ९६ / ०८
७) एल विभाग - १०७ / ०४
८) एम पूर्व विभाग - १६२ / १२
९) एम पूर्व + एम पश्चिम - १४१ / २३
१०) एन विभाग - १२२ / ०१
११) एस विभाग - ८५ / ३४
१२) टी विभाग - १०३/ ०६
१३) एच पूर्व विभाग - ११२/०२
१४) के पूर्व + एच पश्चिम विभाग - ७०/०२
१५) के पश्चिम विभाग + के पूर्व - १०० / ०१
१६) के पश्चिम विभाग - १२२ / ११
१७) पी दक्षिण विभाग - ७० / ०६
१८) पी पूर्व विभाग- १०५/१२
१९) पी उत्तर विभाग - ७१/०२
२०) आर दक्षिण विभाग - ९३/१६
२१) आर मध्‍य विभाग- ४२/०३
२२) आर उत्तर विभाग - ५२ / ०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com