१ कोटींहून अधिक मतदारांसाठी १०,२३१ मतदान केंद्रे सज्ज
एक कोटीहून अधिक मतदारांसाठी १० हजार २३१ मतदान केंद्रे सज्ज
आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती; शाळा, सोसायट्या आणि खासगी इमारतींमध्ये मतदानाची सोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी प्रशासन सज्ज झाले असून, मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संपूर्ण मुंबईत एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबईतील एकूण एक कोटी तीन लाख ४४ हजार ३१५ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २२७ प्रभागनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांची संख्या आणि भौगोलिक सोय लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि खासगी इमारतींमध्ये ही केंद्रे उभारली जाणार आहेत.
.........
मतदारांसाठी विशेष सुविधा
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता राखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत.
* मूलभूत सुविधा : पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, प्रसाधनगृहे आणि रॅम्पची व्यवस्था
* विशेष लक्ष : दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधांची तरतूद
* मतदार सहाय्य केंद्र : मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी प्रत्येक केंद्राजवळ मतदार सहाय्य केंद्र स्थापन केले जाईल.
* माहिती फलक : दिशादर्शक आणि माहिती देणारे फलक सर्व केंद्रांवर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
----
आयुक्त भूषण गगराणी यांचे आवाहन
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही सूक्ष्म नियोजन केले आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र आधीच तपासून घ्यावे, असे आवाहन आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.
मुंबईच्या सात परिमंडळांतील २४ प्रशासकीय विभागांनुसार ही रचना करण्यात आली असून, सर्व केंद्रांची पाहणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पूर्ण करण्यात आली आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

