महायुतीच्या विजयासाठी रयत क्रांती पक्षाच्या मुंबईत घोंगडी बैठका

महायुतीच्या विजयासाठी रयत क्रांती पक्षाच्या मुंबईत घोंगडी बैठका

Published on

महायुतीच्या विजयासाठी रयत क्रांती पक्षाच्या मुंबईत घोंगडी बैठका
मुंबई, ता. ३ (बातमीदार) ः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत १० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रयत क्रांती पक्षाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप-शिवसेना महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या या पक्षाचे मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. त्याच्या माध्यमातून आपला प्रभाव असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घोंगडी बैठकांवर जोर दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत केलेली विकासकामे ते घराघरात पोहोचवत मतदारांना आपलेसे करीत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत हे रयत क्रांती पक्षाची स्थापन करीत महायुती सोबत राहिले. राज्यात सुमारे तीन-चार वर्षे मंत्री राहिलेल्या खोत यांनी आपल्या पक्षाचे जाळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या माध्यमातून घट्ट केले आहे. त्याचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत फायदा झाला आहे. त्यामुळे ते आता मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत. त्यानुसार घोंगडी बैठका, मंडळाच्या बैठका घेतल्या जात असल्याची माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.
निवडणुका जिंकण्यासाठी रणनीतीची आवश्यकता असते. त्याचा भाग म्हणून रयत क्रांती पक्षाचे कार्यकर्ते भाजप, शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. तसेच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे दीपक भोसले यांनी सांगितले.

या जिल्ह्यात प्रभाव
रयत क्रांती पक्षाचा मूळ पाया हा शेतकरी आहे. त्यामुळे पक्षाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत आहे. येथील अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले असून, त्यांचा काळाचौकी, करी रोड, कुर्ला, भांडुप, मानखुर्द, घाटकोपर, गोवंडी, घाटला, पवई, चांदीवली येथेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

नियोजन
- मोदी सरकारने आणि राज्यातील फडणवीस सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणे.
- पक्षाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांत ४०-५० कार्यकर्ते कार्यरत
- महायुतीच्या प्रचारासाठी घटक प्रमुख पक्षांसोबत बैठका
- सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

आमचा पक्ष गेल्या १० वर्षांपासून महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते मुंबईत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक आणण्यासाठी काम करीत आहेत, सरकारची विधायक कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शिस्तबद्धरीतीने करीत आहेत.
- दीपक भोसले, राज्य कार्याध्यक्ष, रयत क्रांती पक्ष
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com