२२ ठिकाणी रिपाई, बसपा, वंचित आमनेसामने
२२ ठिकाणी रिपाइं, बसपा, वंचित आमनेसामने
दलित मतांमधील फूट कोणाच्या पथ्यावर?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत दलित टक्का मोठा आहे, पण नेहमीप्रमाणे या वेळीसुद्धा मुंबई महापालिकेसाठी रिपाइंचे दोन गट आणि बसप एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांत तीनचतुर्थांश दलित टक्का असून, दलित मते विविध गटांच्या उमेदवारांमध्ये विभागली जाणार आहेत. त्याचा फायदा बड्या पक्षांना होणार आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. काँग्रेस १४३ आणि वंचित ५० जागा लढवत आहे. तर रिपाइं महायुतीमध्ये आहे. मात्र महायुतीने एकही जागा न सोडल्याने १३ जागा स्वबळावर लढण्याची वेळ रिपाइंवर आली आहे. तसेच रिपब्लिकन सेनेचे सहा आणि रिपब्लिकन पार्टी (खोरिपा)चे पाच उमेदवार आहेत.
बसप ६८ जागा स्वतंत्रपणे लढवत आहे. सुशिक्षित आणि नोकरदार वर्ग बसपाचा पाठीराखा आहे. बसपा उमेदवार निवडून येत नसले तरी त्यांना पडलेल्या मतांची टक्केवारी वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे बसपा या वेळीसुद्धा चांगली मते खेचू शकतो.
मुंबई महापालिका निवडणुकीत दलित मतदारांचा कौल हा विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर अवलंबून असतो. त्यात महागाई, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मुंबईतील दलित वस्त्यांचा विकास यांसारख्या प्रश्नांना महत्त्व दिले जाते. अलीकडे आंबेडकरी चळवळीतील पक्षही निर्णायक भूमिका बजावत आहेत , मात्र अनेक उमेदवार असल्याने मतांमध्ये फूट पडते. या मतांमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा विशेषतः बड्या पक्षांना होतो.
या ठिकाणी तीन पक्ष मैदानात
दलित मतदानाची टक्केवारी कमी असताना काही ठिकाणी तीन पक्ष मैदानात उतरत आहेत. प्रभाग क्रमांक ३८ रिपाइं विरुद्ध बसपा विरुद्ध वंचित, प्रभाग क्रमांक १११ वंचित विरुद्ध बसपा विरुद्ध रिपाइं, प्रभाग क्रमांक ११४ वंचित विरुद्ध बसपा विरुद्ध रिपब्लिकन सेना, प्रभाग क्रमांक १२५ रिपाइं विरुद्ध बसपा विरुद्ध रिपाइं (गवई), १८१ वंचित विरुद्ध रिपाइं विरुद्ध रिपाइं (खोरिपा) यांचा समावेश आहे.
वाॅर्ड क्र - लढती
३८ - रिपाइं विरुद्ध बसपा विरुद्ध वंचित
३९ - रिपाइं विरुद्ध वंचित
४२ - वंचित विरुद्ध बसपा
५३ - वंचित विरुद्ध बसपा
५४ - रिपाइं विरुद्ध वंचित
६७ - वंचित विरुद्ध बसपा
१११ - वंचित विरुद्ध बसपा विरुद्ध रिपाइं
११४ - वंचित विरुद्ध बसपा विरुद्ध रिपब्लिकन सेना
११६ - वंचित विरुद्ध बसपा
११८ - वंचित विरुद्ध बसपा
११९ - वंचित विरुद्ध रिपाई
१२२ - वंचित विरुद्ध बसपा
१२५ - रिपाइं विरुद्ध बसपा विरुद्ध रिपाइं (गवई)
१३३ - वंचित विरुद्ध बसपा
१४६ - वंचित विरुद्ध बसपा
१४८ - वंचित विरुद्ध बसपा
१५५ - रिपाइं विरुद्ध रिपब्लिकन सेना
१८१ - वंचित विरुद्ध रिपाइं विरुद्ध रिपाइं खोरिपा
१८५ - रिपाइं विरुद्ध रिपाइं (खोरिपा)
१९९ - वंचित विरुद्ध बसपा
२०० - बसपा विरुद्व रिपब्लिकन सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

