मुंबई काँग्रेसचे ‘मिशन बेस्ट’!

मुंबई काँग्रेसचे ‘मिशन बेस्ट’!

Published on

मुंबई काँग्रेसचे ‘मिशन बेस्ट’!
मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमासाठी आपला स्वतंत्र आणि क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘बेस्ट ही नफा कमावणारी संस्था नसून, ती सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक सेवा आहे,’ असे ठाम प्रतिपादन करीत काँग्रेसने बेस्टच्या संपूर्ण कायापालटाची ‘ब्लू प्रिंट’ सादर केली.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वांत मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे बेस्टचे खासगीकरण रोखण्याची. सध्या सुरू असलेली ‘वेट-लीज’ पद्धत कामगारांचे शोषण करणारी आणि अपारदर्शक असल्याची टीका करीत काँग्रेसने ती बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या तीन वर्षांत संचालन, देखभाल आणि कर्मचारी व्यवस्था पूर्णपणे पुन्हा ‘बेस्ट’कडे सोपवली जाईल. तसेच गेल्या काही वर्षांत झालेल्या खर्चाच्या वाढीचे ‘कॅग’मान्य संस्थेकडून लेखापरीक्षण करण्याची ग्वाही दिली आहे. बेस्टला आर्थिक संकटातून कायमचे बाहेर काढण्यासाठी ‘बेस्ट’चा खर्च थेट मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा भाग केला जाईल. यामुळे बेस्टला दरवेळी महापालिकेकडे निधीसाठी हात पसरावे लागणार नाहीत. तसेच कोणतीही भाडेवाढ करण्यापूर्वी सार्वजनिक सुनावणी आणि समितीचा अहवाल अनिवार्य असेल, अशी कायदेशीर हमी काँग्रेसने दिली आहे. ‘आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर मुंबईच्या या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी उत्तरदायी प्रशासन देण्याचा शब्द देत आहोत,’ असे काँग्रेसने या जाहीरनाम्याद्वारे स्पष्ट केले आहे.
...
हे करणार...
- २०२८ पर्यंत ३,००० नवीन बस विकत घेऊन ताफा ६,००० पार नेला जाईल.
- मिनी बसऐवजी मोठ्या बसना प्राधान्य दिले जाईल.
- किमान ४० टक्के बस या झोपडपट्टी आणि औद्योगिक क्षेत्रांतील प्रवाशांसाठी राखीव असतील.
- २०१७ पूर्वीचे कुलाबा-बोरिवलीसारखे लांब पल्ल्याचे मार्ग पुन्हा सुरू करणार.
- ‘ड्रायव्हर ओन्ली’ बस पद्धत बंद करून पुन्हा वाहक नियुक्त केले जातील.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान कामासाठी समान वेतन दिले जाईल.
- सर्व कर्मचाऱ्यांना ठरावीक कामाचे तास आणि वैद्यकीय विमा सुनिश्चित केला जाईल.
- डेपोच्या जमिनींचे रक्षण करणार.
- प्रवाशांसाठी भारतातील पहिली हक्क व सुरक्षा सनद आणणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com