पीपीटी दाखवत नाही; काम करून दाखवतो!
पीपीटी दाखवत नाही; काम करून दाखवतो!
शायना एन. सी. यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः ‘आम्ही केवळ फोटो आणि पीपीटी दाखवण्यात विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो,’ अशी टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी ठाकरे बंधूंवर केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचीही माहिती दिली.
शायना एन. सी. म्हणाल्या, की ‘आम्ही केवळ फोटो आणि पीपीटी दाखवण्यात विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. मुंबईत ३०० एकर जागेवर ग्रीन पार्क विकसित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोस्टल रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून इंधनाचा वापर कमी होत आहे, त्यामुळे प्रदूषणातही घट होत आहे. मेट्रो प्रकल्प आणि इलेक्ट्रिक बस स्वच्छ व हरित मुंबईच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संपूर्ण देशासह महाराष्ट्रासमोर वायू प्रदूषण मोठी समस्या उद्भवली आहे. राज्यात हवेची गुणवत्ता खालावत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत,’ अशीही शायना एन. सी. यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या, की ‘महायुती सरकारच्या कार्यकाळात प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी योजना राबवण्यात आल्या, ज्या ठाकरेंच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळाल्या नाहीत. ठाकरे यांनी भूमिगत मेट्रोसारख्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना विरोध केला. याउलट, महायुती सरकारने जनहित आणि विकासाला प्राधान्य देत असे निर्णय घेतले, जे ठाकरे यांचे सरकार घेण्यात अपयशी ठरले.’
..
१.८५ कोटी मतदार प्रथमच मतदान करणार
एका सर्वेक्षणानुसार येणाऱ्या निवडणुकीत सुमारे १.८५ कोटी मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. या मतदारांना कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार, असे विचारले असता त्यांनी एअर क्वालिटी इंडेक्स, प्रदूषण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि मोकळ्या जागांना प्राधान्य दिले. भावी पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दिशेने पुढेही अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील, असे त्या म्हणाल्या.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

