२३३ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस
२३३ बांधकामांना काम
थांबवण्याची नोटीस
वायू प्रदूषणप्रकरणी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. डिसेंबर २०२५मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३३ बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ५५७ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने साेमवारी (ता. ५) दिली.
विभागस्तरावर विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून, बांधकामस्थळी धूळ रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण, हिरव्या कापडाचे आच्छादन आणि पाणीफवारणी बंधनकारक करण्यात आली आहे. १,०८० बांधकाम ठिकाणी ‘लो कॉस्ट सेन्सर’ बसवण्यात आले आहेत. ज्या भागात वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २००च्या वर जाईल, तिथे ‘ग्रॅप ४’अंतर्गत बांधकामे तातडीने थांबवली जाणार आहेत.
मुंबईत सध्या २८ अधिकृत वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे कार्यरत आहेत. १ व २ जानेवारीला मुंबईची हवा ‘समाधानकारक’ होती, तर ३ व ४ जानेवारीला ती ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवण्यात आली हाेती.
-----
अधिकृत माहितीच गाह्य धरा!
काही त्रयस्थ संस्था किंवा खासगी ॲप्स उपग्रहावर आधारित केवळ अंदाज वर्तवतात. अनेकदा ते दिशाभूल करणारे असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी केवळ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा ‘समीर’ मोबाईल ॲपवरील वायू गुणवत्ता निर्देशांकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

