प्रदूषणकारी १० आरएमसी प्लांट बंद

प्रदूषणकारी १० आरएमसी प्लांट बंद

Published on

प्रदूषणकारी १० आरएमसी प्लांट बंद

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ८४ लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) आक्रमक पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आणि मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या विशेष मोहिमेत १० प्रदूषणकारी आरएमसी प्लांट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध प्लांटकडून ८४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दोन दिवसांत मंडळाच्या भरारी पथकांनी ४४ आरएमसी प्लांटची कसून तपासणी केली. यात धुळीचे नियंत्रण न करणे आणि पर्यावरण नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळल्याने १० प्लांटवर ‘क्लोजर नोटीस’ बजावून ते बंद करण्यात आले आहेत. यात डोंबिवलीतील स्वामीनारायण लाइफस्पेस एलएलपी, कल्याणमधील मे. जे.आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., अंबरनाथमध्ये श्रीराम इंटरप्रायजेस (टेंबघर), भिवंडीमध्ये प्रिझम जॉनसन लिमिटेड आणि एल अँड टी, दहिसर मोरीतील कृष्णा कन्स्ट्रक्शन्स, तुर्भे (नवी मुंबई)मध्ये प्रकाश इंजिनीअर्स अँड इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि ए. पी. कन्स्ट्रक्शन्स, विरारमध्ये गजानन साईदत्त असोसिएट्स, वरळीत आर.डी.एस. प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.
पर्यावरण मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल १७ आरएमसी प्लांटकडून (कल्याण ९, रायगड ७, नवी मुंबई १) ८४ लाख रुपयांची बँक हमी दंड स्वरूपात वसूल करण्यात आली आहे. याशिवाय २९ मोठ्या बांधकाम प्रकल्पांचीही तपासणी करण्यात आली असून, पाच प्रकल्पांना कडक निर्देश देण्यात आले आहेत.
----
२४० प्लांटची तपासणी
डिसेंबरपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत २४० आरएमसी प्लांटची तपासणी करण्यात आली असून चार कोटी ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह हे या मोहिमेचा दैनंदिन आढावा घेत असून, ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com