आयआयटीत परम रुद्र सुपरकॉम्प्युटर

आयआयटीत परम रुद्र सुपरकॉम्प्युटर

Published on

आयआयटीत परमरुद्र सुपरकॉम्प्युटर
डीएसटीचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते उद्‍घान

मुंबई, ता . ८ : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी आज आयआयटी मुंबई येथे प्रगत संगणकीय सुविधा असलेल्या परमरुद्र या सुपरकॉम्प्युटरचे उद्‍घाटन केले. ही सुविधा सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या वतीने उभारण्यात आली आहे.
तीन पेटा फ्लॉप्स क्षमतेची ही उच्च कार्यक्षमता संगणन (एचपीसी) प्रणाली राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन (एनएसएम)अंतर्गत बिल्ड अ‍ॅप्रोच पद्धतीने विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे. परमरुद्र ही सी-डॅक यांनी स्वदेशी पद्धतीने डिझाइन केलेल्या रुद्र सर्व्हरवर आधारित असून, तिचे उत्पादन भारतातच करण्यात आले आहे. यामुळे भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला बळ मिळाले आहे. ही प्रणाली सी-डॅकच्या स्वदेशी सॉफ्टवेअर स्टॅकवर चालते आणि अधिक कार्यक्षमतेसाठी अत्याधुनिक डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कूलिंग (डीसीएलसी) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या भाषणात प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितले की, परमरुद्र सुविधा संगणकीय संशोधनाला मोठ्या प्रमाणावर बळ देईल. याचा लाभ आयआयटी मुंबईतील २००हून अधिक प्राध्यापक आणि १,२०० विद्यार्थी तसेच देशभरातील संशोधकांना होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील नवोन्मेषाला ही सुविधा चालना देईल तसेच स्टार्टअप्स आणि उद्योगप्रधान संशोधनालाही पाठबळ देईल, असे त्यांनी नमूद केले.
...
महत्त्वाचा टप्पा
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (मैती) समूह समन्वयक सुनीता वर्मा यांनी रुद्र-आधारित क्लस्टर हा भारताच्या स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंग प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. एक्सास्केल संगणकाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एचपीसी प्रणाली, सॉफ्टवेअर, मायक्रोप्रोसेसर आणि नेटवर्किंग क्षेत्रात सातत्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
...
संशोधन संधी वाढवेल!
एनएसएमचे मिशन डायरेक्टर डॉ. हेमंत दरबारी यांनी सांगितले की, या नव्या समावेशामुळे राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत देशभरात एकूण ४४ पेटा फ्लॉप्स क्षमतेचे ३८ सुपरकॉम्प्युटर्स कार्यान्वित झाले आहेत. आयआयटी बॉम्बे येथील परम रुद्र सुविधा मुंबई व परिसरातील अनेक संस्थांच्या संशोधन संधी वाढवेल आणि सहकार्य व वैज्ञानिक निष्कर्षांना चालना देईल, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com