आंबेडकरी जनतेच्या पाठिंब्यामुळेच महायुतीचा महापौर होईल ः आठवले
आंबेडकरी जनतेच्या पाठिंब्यामुळेच
महायुतीचा महापौर होईल ः आठवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भीमनगरमुळे मी केंद्रात मंत्रिपदापर्यंत पोहोचलो आहे. आंबेडकरी जनतेची भीमशक्ती माझ्याकडे असल्यामुळे मी ज्यांच्यासोबत जातो त्यांची सत्ता येते. मुंबईतसुद्धा आंबेडकरी जनतेच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा महापौर होईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. घाटकोपरच्या भीमनगर येथे महायुतीच्या उमेदवार अलका भगत यांच्या जाहीर प्रचारसभेत आठवले बोलत होते.
या वेळी स्थानिक आमदार राम कदम, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, महायुतीच्या अधिकृत उमेदवार अलका गणेश भगत, भाजपच्या नेत्या सुनीता पंदिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. आठवले म्हणाले, की घाटकोपरमधील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी विकासाचा दूरदृष्टिकोन असणाऱ्या महायुतीच्या भाजप, शिवसेना, रिपाइंच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. एसआरएमध्ये किमान ४५० चौरस फुटांचे घर झोपडपट्टीवासीयांना मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
...
आठवले म्हणाले...
- भीमनगरमधील जनतेच्या पाठिंब्यामुळेच मी माझा राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत करू शकलो.
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मी देशभर घेऊन जात आहे.
- देशातील २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकत आहे.
- नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली आहे.
- आणखी दोन राज्यांत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यास रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्त होईल.
- माझा रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आंबेडकरी जनतेचा आहे. आम्ही सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चाललो आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

