गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ३० उमेदवार रिंगणात

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ३० उमेदवार रिंगणात

Published on

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ३० उमेदवार रिंगणात
एकावर २५ गुन्हे; ९८ टक्के स्वच्छ प्रतिमेचे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३० उमेदवारांविरोधात दोन किंवा त्याहून अधिक वर्षे कारावास होईल, असे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी शहजादा मलिक उर्फ सज्जू मलिक यांच्यावर तब्बल २५ गुन्हे दाखल आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
२०१७ च्या निवडणुकीत २१६ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यातील १५४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल होते. त्या तुलनेत यंदा सर्वच राजकीय पक्षांनी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांनाच पसंती दिल्याचे दिसते. यंदाच्या निवडणुकीत १,७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सुमारे ३० म्हणजेच १.७६ टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सज्जू मलिक यांच्यावर २५ गुन्हे दाखल आहे. ‘‘माझ्यावर गुन्हे दाखल असले, तरी त्यातील एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही,’’ अशी प्रतिक्रिया मलिक यांनी नोंदवली.
----
सर्वाधिक गुन्हे असलेले उमेदवार
नाव (पक्ष) गुन्ह्यांची संख्या
प्रभाकर शिंदे(भाजप) सहा
दीपक हनवते(अपक्ष) पाच
पंकज चंदनशिवे (अपक्ष) चार
सचिन कासारे (रिपाइं) तीन
विनोद जाधव (रिपाइं) दोन
हरी शास्त्री (ठाकरे गट) दोन
चंद्रशेखर वायंगणकर (अपक्ष), दोन

Marathi News Esakal
www.esakal.com