तीन अवयवदानांतून नऊ जणांना नवजीवन

तीन अवयवदानांतून नऊ जणांना नवजीवन

Published on

तीन अवयवदानांतून नऊ जणांना नवजीवन
गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईमध्ये २०२६ या नव्या वर्षाच्या पहिल्या १० दिवसांत तीन मेंदूमृत अवयवदानांच्या घटना घडून नऊ रुग्णांना नवजीवन मिळाले, तर दोघांना दृष्टीदेखील मिळाली. अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया अशा विविध अवयवांचे यशस्वी दान झाले असून, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचे वितरण करण्यात आले आहे.
७ जानेवारीला पहिली अवयवदानाची नोंद जसलोक रुग्णालयात झाली. ४६ वर्षांच्या महिलेला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या दानातून हृदय, फुप्फुस, यकृत तसेच डोळ्यांचे कॉर्निया दान करण्यात आले. या अवयवांमुळे चार गंभीर रुग्णांना नवे जीवन मिळाले असून, दोघांना दृष्टी मिळाली आहे. दुसरी नोंद शुक्रवारी (ता. ९) माहीम येथील एस. एल. रहेजा रुग्णालयात झाली. ७६ वर्षांच्या पुरुष रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाची संमती दिल्यानंतर त्यांचे यकृत आणि दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. त्यानंतर तिसरी नोंद शनिवारी (ता. १०) ठाण्यातील होरायझन प्राइम रुग्णालयात नोंदविण्यात आली. येथील ७६ वर्षांच्या पुरुष रुग्णाकडून दोन मूत्रपिंडांचे दान करण्यात आले असून, त्यामुळे आणखी दोन रुग्णांचे जीवदान मिळाले आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात अवयवदान चळवळीला नवे बळ देणारी ठरली आहे. अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या प्रशासकीय अधिकारी आणि प्रत्यारोपण समन्वयक संगीता देसाई यांनी सांगितले, की मेंदूमृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा संवेदनशील निर्णय अनेक गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
...
आशादायी बाब
नव्या वर्षांच्या पहिल्या १० दिवसांत तीन अवयवदानाच्या घटना घडणे, ही मुंबईसाठी आशादायी बाब मानली जात आहे. अवयवदानामुळे केवळ रुग्णांचे प्राण वाचत नाहीत, तर समाजात माणुसकीचा, संवेदनशीलतेचा आणि परस्पर सहकार्याचा संदेशही पोहोचतो. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाची शपथ घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com