भाजप प्रदेशाध्यक्षांना भांडुपमध्ये धक्का
भाजप प्रदेशाध्यक्षांना भांडुपमध्ये धक्का
उमेदवाराचा पराभव; मनसेच्या ज्योती राजभोज विजयी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक ११५च्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. चव्हाण यांनी आपल्या बालपणीच्या मित्राच्या पत्नीसाठी प्रतिष्ठेची केलेली ही जागा अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हिसकावून घेतली. मनसेच्या उमेदवार ज्योती राजभोज यांनी स्मिता परब यांचा पराभव केला. परब यांना ३,२८० मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
प्रभाग क्रमांक ११५ची उमेदवारी रवींद्र चव्हाण यांनी आपले बालपणीचे मित्र संजय परब यांच्या पत्नी स्मिता परब यांच्यासाठी पक्षाकडून हट्टाने मागून घेतली होती. या प्रभागाची संपूर्ण निवडणूक रणनीती खुद्द चव्हाण यांनी आखली होती. निवडणुकीच्या काळात त्यांनी या भागात दोन ते तीन मोठ्या बैठका घेतल्या होत्या. स्मिता परब यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत सुरुवातीपासूनच मोठी नाराजी होती. महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेतही या उमेदवारीवरून अस्वस्थता पसरली होती. ही अंतर्गत नाराजी भाजपला महागात पडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मनसे आणि ठाकरे गट एकदिलाने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मनसेच्या आक्रमक प्रचारासमोर भाजपची यंत्रणा तोकडी पडल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
.......
ज्योती राजभोज (मनसे) : १२,४५२
स्मिता परब (भाजप) : ९,१७२
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

