उत्तरमुंबई

उत्तरमुंबई
Published on

उत्तर मुंबई वार्तापत्र
उत्तर मुंबईचा गड भाजपने राखला
गेले किमान ३० ते ३५ वर्षे आपल्या ताब्यात असलेला उत्तर मुंबईचा गड भाजपने याही वेळेस कायम राखला आहे. उत्तर मुंबईमधील महापालिकेच्या साधारण ३८ प्रभागांपैकी भाजपने २३ प्रभाग जिंकून आपले वर्चस्व ठेवले आहे. समाजवादी नेत्या मृणाल गोरे, रवींद्र वर्मा यांच्यानंतर उत्तर मुंबईचा ताबा भाजपने घेतला. राम नाईक, गोपाळ शेट्टी आदींनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर गुजराती, मराठी उच्च मध्यमवर्गीयांची मते असल्याने हा प्रभाग पहिल्यापासूनच भाजपने सहजतेने आपल्या ताब्यात ठेवला होता.
उत्तर मुंबईमध्येही मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. तर लिंक रोडवरील मोठ्या झोपडपट्ट्या, मालवणीची अजस्त्र झोपडपट्टी या ठिकाणी मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण आता सर्वच ठिकाणी उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये भाजपाने आपले संघटनात्मक जाळे एवढे मजबूत केले आहे, की त्यांना अशा एखाद्या समाज गटावर जास्त भिस्त न ठेवूनही चालू शकते. विशेष म्हणजे पूर्ण मुंबईत २६,०८८ अशी सर्वाधिक मते मिळवून विजय झालेले जीग्नासा शाह (प्रभाग क्रमांक १५) हे देखील भाजपचेच आहेत. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी, जैन व अन्य उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय समाज यांच्यात भाजपने आता पसरलेले हातपाय पाहता त्यांचा येथे पराभव करणे हे फार कठीण आहे. यापूर्वी काँग्रेसकडे जाणारी उत्तर भारतीय, गुजराती मते जर आता भाजपकडून पुन्हा काँग्रेसकडे गेली तरच या मतविभागणीचा फायदा शिवसेनेला मिळेल आणि भाजपची येथील पकड सैल होईल. अर्थात ही शक्यता नजीकच्या भविष्यकाळात तरी प्रत्यक्षात उतरणार नाही हे देखील तितकेच खरे.

काँग्रेस आणि ठाकरे गटाची स्थिती
पूर्वी झोपडपट्ट्यांमधील उत्तर भारतीय मतदार हे प्रामुख्याने काँग्रेसला साथ देत होते. मात्र आता मोदी-शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रभावामुळे गुजराती भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारही भाजपकडे गेल्यामुळे भाजपचे समीकरण आणखीन सोपे झाले आहे. इतकी वर्ष अखंड शिवसेनेसोबत व आता शिंदे गटासोबत भाजपने येथील मराठी मतदारही आपल्याकडे वळवला आहे. सध्या देखील येथील बोरिवलीच्या उपाध्याय यांच्यासह अतुल भातखळकर, योगेश सागर हे चार आमदार भाजपचे असून प्रकाश सुर्वे यांनी मागील दोन वेळा अखंड शिवसेनेचा आता एकनाथ शिंदे यांचा झेंडा येथे फडकवत ठेवला आहे. त्यांच्यामुळेच येथे शिंदे सेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे पाच नगरसेवक हे विखुरलेले आहेत. तर मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या प्रभावामुळे तेथील नगरसेवकांच्या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या. याच पक्षाच्या अजंता यादव यांनी आपल्या कामामुळे आणि उत्तर भारतीयांच्या पाठिंबामुळे विजय मिळवला.

पक्षनिहाय बलाबल (उत्तर मुंबई - ३८ प्रभाग):
उत्तर मुंबईतील निकालांचे चित्र खालीलप्रमाणे स्पष्ट झाले आहे:
भाजपा: २३ प्रभाग (सर्वाधिक)
शिवसेना (शिंदे गट): ०६ प्रभाग
शिवसेना (ठाकरे गट): ०५ प्रभाग
काँग्रेस: ०३ प्रभाग
मनसे: ०१ प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com