सर्वोत्तम प्रभाग करण्यासाठी कामाला लागा

सर्वोत्तम प्रभाग करण्यासाठी कामाला लागा

Published on

सर्वोत्तम प्रभाग करण्यासाठी कामाला लागा
जनतेशी संवाद साधा; एकनाथ शिंदे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ‘मुंबईतील मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करायचे आहे. तुमचा प्रभाग मुंबईतील सर्वोत्तम प्रभाग बनवण्यासाठी लोकांमध्ये जा, त्यांची कामे करा आणि प्रभागातील कामांचा आराखडा तयार करा,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना रविवारी (ता. १८) दिले. हॉटेल ताज लॅंड्स एंड येथे आयोजित नगरसेवकांच्या शिबिराला त्यांनी मार्गदर्शन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘आजपासूनच कामाला लागा, जी संधी आपल्याला मिळाली आहे, त्याचे सोने करायचे आहे, आपला प्रभाग मुंबईतला सर्वोत्तम प्रभाग कसा होईल, यासाठी प्रत्येक नगरसेवकाने प्रयत्न करावेत, नगरसेवकांनी लवकर उठून प्रभागात फेरफटका मारावा. तेथील स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन अशा जनहिताच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करावी. प्रभागातील स्वच्छतेवर काटेकोरपणे भर द्यावा, डीपक्लीन ड्राइव्ह घ्या, प्रभागात बदल दिसले पाहिजेत,’ अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली. पुढे त्यांनी सांगितले, की ‘प्रभागातील मंडई, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असे मोठ्या कामांचे प्रस्ताव तयार करावेत. प्रभागामधील आरोग्यसेवा योग्य झाली पाहिजे. शिवसेनेचा नगरसेवक लोकांमध्ये फिरताना दिसलाच पाहिजे, त्यासाठी लोकांचे मत जाणून घ्या, त्यांना विकासात भागीदार करा, कोणत्याही कामाला नाही म्हणू नका,’ असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले.


भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला!
‘महापालिका निवडणुकीत भावनिक मुद्दे हरले आणि विकास जिंकला,’ अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. जनतेला विकास हवा आहे. महायुती सरकारने घेतलेले निर्णय, पागडीमुक्त मुंबई तसेच ज्या इमारतींना ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) दिली, त्यांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत नगरसेवकांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com