काँग्रेस-वंचितमधील गोंधळ महायुतीच्या पथ्यावर
काँग्रेस-वंचितमधील गोंधळ महायुतीच्या पथ्यावर
१६ पैकी ११ जागांवर भगवा फडकला
नितीन जगताप, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत जागावाटपावरून झालेला गोंधळ महायुतीसाठी (भाजप-शिंदे गट) फायद्याचा ठरला आहे. वंचितने ऐनवेळी परत केलेल्या १६ जागांपैकी तब्बल ११ जागांवर महायुतीने बाजी मारली आहे, तर उर्वरित पाच जागांवर शिवसेना (ठाकरे गट) विजयी झाली आहे.
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला ६२ जागा सोडल्या होत्या आणि स्वतः १५० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वंचितला १६ जागांवर उमेदवारच मिळाले नाहीत. ही बाब वंचितने काँग्रेसला वेळेत न कळवल्यामुळे काँग्रेसलाही त्या जागांवर आपले उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी, या १६ जागांवर काँग्रेसची ताकद शून्य झाली आणि याचा थेट फायदा विरोधकांना मिळाला. ६२ पैकी केवळ ४६ जागांवर अर्ज भरले. एकही उमेदवार निवडून आला नाही, तर काँग्रेसला २४ जागांवर समाधान मानावे लागले. वंचितने सोडलेल्या १६ जागांपैकी नऊ जागांवर भाजप, दोन जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि पाच जागांवर शिवसेना (ठाकरे गट) विजयी झाले.
राजकीय समीकरणे ठरली फेल
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष विभागले गेले होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत, तर शरद पवारांनी अजित पवारांसोबत जुळवून घेतले होते. अशा स्थितीत काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी हातमिळवणी केली होती. काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि वंचित फॅक्टर एकत्र येऊन मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र खराब नियोजनामुळे ही आघाडी सपशेल अपयशी ठरली आहे.
प्रभागनिहार विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
६ दीक्षा हर्षद केरकर शिंदे गट
११ डॉ. आदिती खुरसंगे शिंदे गट
१३ राणी द्विवेदी-निघोट भाजप
१४ सीमा किरण शिंदे भाजप
१५ जिग्ना शहा भाजप
१९ दक्षता कवठणकर भाजप
२१ लीना देहेरकर भाजप
३० धवल व्होरा भाजप
४६ योगिता कोळी भाजप
८० दिशा यादव भाजप
८४ अंजली सामंत भाजप
११७ श्वेता पावसकर ठाकरे गट
१५३ मिनाक्षी पाटणकर ठाकरे गट
१८२ मिलिंद वैद्य ठाकरे गट
१९८ अबोली खाडये ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

