

मविआतील ‘बिघाडी’ महायुतीच्या पथ्यावर!
ठाकरे गट, काँग्रेसच्या भांडणात १४ जागा गमावल्या
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तंतोतंत खरी ठरली आहे. लोकसभा आणि विभानसभा निवडणुका एकत्रितपणे लढलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या महावितकास आघाडीत बिघाडी झाल्याने मुंबईत एक-दोन नव्हे तर १४ जागा पाण्यात गेल्या आहेत. संबंधित प्रभागात शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली मते आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतांची बेरीज जास्त होत असताना केवळ वेगवेगळे लढल्याने कमी मते मिळालेल्या भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप-शिवसेनेने महायुती म्हणून लढवली. मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले शिवसेना ठाकरे, काँग्रेस मुंबईत वेगवगेळे लढले. शिवसेनेसोबत मनसे आल्याने काँग्रेसने घेतलेली फारकत भाजपच्या पथ्यावर पडली आहे. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे प्राबल्य असतानाही केवळ मतविभाजनामुळे भाजपचा फायदा झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे ठाकरे आणि काँग्रेस एकत्रित लढले असते, तर मुंबईचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते, असा विश्वास आता कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत. मतविभाजनामुळे ठाकरे गटाचे आठ, काँग्रेसचे चार, तर मनसेचे दोन उमेदवार किरकोळ फरकाने पराभूत झाले असून, त्या ठिकाणी भाजप, शिवसेनेला संधी मिळाली आहे.
प्रभाग क्र. ७
गणेश खणकर भाजप - १०,१८४
सौरभ घोसाळकर शिवसेना ठाकरे - ९,३५१
आशीष फर्नांडिस काँग्रेस - १,६७२
प्रभाग क्र. २३
शिवकुमार झा भाजप - ७,०९०
किरण जाधव मनसे - ५,८१०
आर पी पांडे काँग्रेस - १,३१७
प्रभाग क्र. ३१
मनीषा यादव भाजप - १०,५०१
भाग्यलक्ष्मी पुरोहीत काँग्रेस - १०,२२३
ज्योती मोरे शिवसेना ठाकरे - १,८०३
प्रभाग क्र. ५२
प्रिती सातम भाजप - ९,९१७
सुप्रिया गाढवे शिवसेना ठाकरे - ८,९५३
स्वाती सांगळे काँग्रेस - १,३९९
प्रभाग क्र. ६३
रूपेश सावरकर भाजप - ९,१९३
देवेंद्र आंबेरकर शिवसेना ठाकरे - ८,६५५
प्रियंका सानप काँग्रेस - ४,३८०
प्रभाग क्र. ६५
विठ्ठल बंदेरी भाजप - ८,३२८
प्रसाद आयरे शिवसेना ठाकरे - ७,२४५
सुफियान हैदर काँग्रेस - ६,१६१
प्रभाग क्र. ८६
कमलेश राय शिवसेना - ८,२४८
क्लाईव्ह डायस शिवसेना ठाकरे - ६,२८४
नितिन सलाग्रे काँग्रेस - ३,३१७
प्रभाग क्र. ९१
सगुण नाईक शिवसेना - ८,८३०
कृष्णा म्हाडगुत शिवसेना ठाकरे - ७,१४०
मोहम्मद शेख काँग्रेस - ४,१३६
प्रभाग क्र. ९६
आयेशा खान राष्ट्रवादी काँग्रेस - ७,१६२
शबाना जाकीर काँग्रेस - ४,४४०
सना हाजी हलिम शेख शिवसेना ठाकरे - ४,०४०
प्रभाग क्र. १२६
अर्चना भालेराव भाजप - ११,१३४
शिल्पा भोसले शिवसेना ठाकरे - १०,२६३
शाजीदा खान काँग्रेस - १,०६५
प्रभाह क्र. १५४
महादेव शिवगण भाजप - ११,३४९
शेखर चव्हाण शिवसेना ठाकरे - ९,८८५
मुरलीकुमार पिल्ले काँग्रेस - २,५९०
प्रभाग क्र. १५९
प्रकाश मोरे भाजप - ६,५२१
प्रल्हाद जोशी काँग्रेस - ६,२४५
श्रीप्रकाश शुक्ला शिवसेना ठाकरे - ३,७५५
प्रभाग क्र. २०९
यामिनी जाधव शिवसेना - ७,९७४
डामुडी रफीया काँग्रेस - ६,४८४
हसिना माहीमकर मनसे - २,१७५
प्रभाग क्र. १६६
मीनल तुर्डे शिवसेना - ६,४३५
राजन खैरनार मनसे - ४,४८०
घनश्याम भापकर काँग्रेस - ३,२८६
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.