मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावर

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावर

Published on

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावर
संपूर्ण मुंबईचा एक्यूआय १२५ वर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील हवेची गुणवत्ता बुधवारी पुन्हा मध्यम स्तरावर पोहोचली असून, शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १२५ नोंदविण्यात आला आहे. मॅरेथॉनच्या काळात पालिकेने राबविलेल्या विशेष उपाययोजनांमुळे रविवारी आणि सोमवारी हवेची स्थिती समाधानकारक होती. मात्र, या उपाययोजनांचा प्रभाव कमी होताच शहरातील हवा गुणवत्ता पुन्हा मध्यम स्वरूपात आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालय यांनी मुंबईतील हवा गुणवत्ता मध्यम स्तरावर असणेही समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर वाहन प्रदूषण, बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि इतर कारणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका कोणत्या ठोस उपाययोजना राबविते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुठे, किती एक्‍युआय?
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक १५७ इतका नोंदविला गेला आहे. मुंबई विमानतळ परिसरात (अंधेरी) एक्यूआय १५१ असून, खेरवाडी-वांद्रे भागात १४४ इतका निर्देशांक आहे. घाटकोपरमध्ये १२४, भायखळा आणि कुर्ला येथे प्रत्येकी १२३, मुलुंड पश्चिमेत ११६, कांदिवलीत ११३, कुलाब्यात ११० तर पवईत ७३ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदविण्यात आला आहे. या भागांव्यतिरिक्त उर्वरित मुंबईत हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

मॅरेथॉनसाठीच्या उपायोजना
मॅरेथॉनच्या काळात वाहन वाहतुकीवर निर्बंध, रस्त्यांवर पाणी फवारणी, बांधकामांवर नियंत्रण आणि धुळीवर उपाययोजना केल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत तात्पुरती घट झाली होती. मात्र, हे उपाय सातत्याने राबविले जात नसल्याने हवा गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावर गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com