ठाकरे बंधूंसमोर आव्हाने कायम

ठाकरे बंधूंसमोर आव्हाने कायम

Published on

ठाकरे बंधूंसमोर आव्हाने कायम
महापालिका निवडणुकांत शिंदे गट, भाजपची सरशी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असली, तरी मुंबई वगळता इतर क्षेत्रांत त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.
​​राज्यातील १२ महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खाते उघडता आले नाही, तर पाच महापालिकांमध्ये त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. २०१७च्या तुलनेत त्यांच्या जागांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. ​दोन्ही नेत्यांनी युतीची घोषणा केली असली तरी, प्रचाराचा मुख्य भर प्रामुख्याने मुंबईवर राहिला. मोजक्या सभांमुळे इतर शहरांतील मतदारांपर्यंत पोहोचण्यात काहीशा मर्यादा आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या एकूण २,८६९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने १,४४० जागा जिंकत ६४.५१ टक्क्यांच्या प्रभावी स्ट्राइक रेटसह पहिले स्थान मिळवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ४०४ जागा जिंकून २७ टक्क्यांच्या स्ट्राइक रेटसह दुसरे स्थान पटकावले. काँग्रेसने ३१८ जागा (११.०८ टक्के), तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) १६४ (५.७१ टक्के) जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला १५६ जागा मिळाल्या असून त्यांचा स्ट्राइक रेट १२.८ टक्के इतका राहिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्याच्या इतर भागांत चांगली कामगिरी करीत १,२००हून अधिक नगरसेवक आणि ५६ नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. भाजपपाठोपाठ शिंदे यांची शिवसेना राज्यातील दुसरा मोठा पक्ष म्हणून समोर आली आहे. एकूण २९ महापालिकांच्या २,८६९ जागांसाठी निवडणूक झाली.
...
परिणाम मर्यादित
बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र या युतीचा मतदानावर होणारा परिणाम सध्या तरी मर्यादित असल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांत स्थान निर्माण करण्यासाठी या युतीला अधिक प्रयत्न करावे लागतील, असे चित्र दिसत आहे.
...
निकाल दृष्टिक्षेपात
पक्ष / जागा / स्ट्राइक रेट (टक्क्यांत)
भाजप - १,४४० / ६४.५१
शिवसेना (शिंदे) - ४०४ / २७
काँग्रेस - ३१८ / ११.८
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - १६४ / ५.७१
शिवसेना (ठाकरे) - १५६ / १२.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com