आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदाेलन

आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदाेलन

Published on

आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदाेलन

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन झाले. या वेळी आंदोलकांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. प्रशासनाशी चर्चा करून मागण्यांबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

मुंबईकडे येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच ताब्यात घेतले. दीपक बोऱ्हाडे यांना रोखण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती; मात्र चकवा देऊन बोऱ्हाडे दुपारी आझाद मैदानात दाखल झाले. माजी खासदार डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश धायगुडे यांच्यासह अनेक नेते आंदाेलनस्थळी उपस्थित हाेते.
अनेक वर्षांपासून समाजाला केवळ आश्वासने मिळाली. आता आम्हाला प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी आहे. जोपर्यंत एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र हाती मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. काही दिवसांत समाजबांधवांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील तारीख निश्चित केली जाईल आणि तेव्‍हा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही बोऱ्हाडे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com