ठाकरे बंधू पुन्हा एकाच मंचावर!
ठाकरे बंधू पुन्हा एकाच मंचावर!
शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. २३ जानेवारीला होणारा हा कार्यक्रम ठाकरे बंधूंच्या भविष्यातील राजकीय रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
यंदाचे वर्ष ठाकरे गटासाठी विशेष आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची ही सुरुवात आहे. या ऐतिहासिक मुहूर्तावर दोन्ही बंधू एकत्र येत असल्याने शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी दोन्ही भावांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, की महापालिका निकालानंतरही आमची युती कायम आहे. ही लढाई अद्याप संपलेली नाही. जोपर्यंत मराठी माणसाला त्याचा हक्क आणि सन्मान मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष कायम राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

