महापौर निवडीबाबत साटम यांचे सूचक विधान

महापौर निवडीबाबत साटम यांचे सूचक विधान

Published on

महापौर निवडीबाबत साटम यांचे सूचक विधान

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २२ : महापालिकेच्या सत्तेचा पेच लवकरच सुटणार असून येत्या दोन-तीन दिवसांत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आणि सत्तेच्या रणनीतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. ‘आगे आगे देखो, होता है क्या!’ असे सूचक विधान त्यांनी केले.
​साटम यांनी सांगितले, की पुढील दोन-तीन दिवसांत भाजपच्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांची बैठक होईल. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवकही उपस्थित राहतील. या संयुक्त बैठकीत ‘सभागृह नेता’ निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या दिवशी ही प्रक्रिया पार पडेल, त्याच दिवशी आम्ही एकत्रितपणे जाऊन आमच्या गटाची नोंदणी करणार आहोत, असेही साटम यांनी सांगितले. ​मुंबईच्या आगामी महापौराबाबत उत्कंठा वाढवताना साटम म्हणाले, ‘आगे आगे देखो होता है क्या! सर्व पत्ते आताच उघडले, तर पुढील मजा राहणार नाही; पण एवढे नक्की की, मुंबईकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू शकेल आणि शहराचे सक्षमपणे नेतृत्व करेल, असेच नेतृत्व आम्ही मुंबईला देऊ.’
...
चोख प्रत्युत्तर
​विरोधकांनी महापौर आरक्षणावर घेतलेल्या आक्षेपांना साटम यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘नगरविकास कायद्यानुसार, मुंबईत किमान तीन नगरसेवक अनुसूचित जमातीचे (एसटी) असतील, तरच हे आरक्षण महापौरासाठी लागू होते. मुंबईत सध्या केवळ दोन नगरसेवक या प्रवर्गाचे असल्याने हे आरक्षण लागू झाले नाही. टीका करणाऱ्या विरोधकांनी कायद्याचे वाचन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com