शिवडी-वरळी उन्नत जोडमार्गासाठी आचार्य दोंदे मार्गावरील उत्तर वाहिनी बंद
शिवडी-वरळी उन्नत जोडमार्गासाठी आचार्य दोंदे मार्गावरील उत्तर वाहिनी बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : भोईवाडा वाहतूक विभाग हद्दीतील शिवडी-वरळी उन्नत जोडमार्ग (न्हावा- शेवा प्रकल्प) कामासाठी आचार्य दोंदे मार्गावरील उत्तर वाहिनी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. एमएमआरडीएमार्फत हे काम सुरू असून, डॉ. वसंत रामजी खानोलकर चौक ते मडकेबुवा चौक (परेल टीटी जंक्शन) पर्यंत स्पॅन आणि पिलर उभारण्यात आहे. ही बंदी २४ जानेवारीपासून ३१ मे २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
दुसरीकडे, आचार्य दोंदे मार्गावरील डॉ. वसंत रामजी खानोलकर चौक ते मडकेबुवा चौक या दक्षिण वाहिनीला एकदिशा मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गही जाहीर करण्यात आले असून, उत्तर वाहिनीवरून जाणारी वाहतूक जेराबाई वाडीया मार्गावरून सरळ जयवंत बाळकृष्ण नाईक चौक (शेतकरी पेट्रोलपंप) येथे उजवे वळण घेऊन डॉ. अर्नेस्ट बोर्जेस मार्गाने डॉ. वसंत रामजी खानोलकर चौकातून इच्छित ठिकाणी पोहोचेल. याशिवाय, जेराबाई वाडीया रोड (परेल टीटी जंक्शन ते जयवंत बाळकृष्ण नाईक चौक) या संपूर्ण मार्गावर नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे. वाहनचालकांनी या बदलांचे पालन करून वाहतुकीला अडथळा येऊ नये याची काळजी घ्यावी, असे वाहतूक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

