अग्निशमन दलाच्या ताफ्यात ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’

अग्निशमन दलाच्या ताफ्यात ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’

Published on

अग्निशमन दलाच्या ताफ्यात ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’
​मुंबई, ता. २५ : मुंबईच्या शौर्याचा आणि इतिहासाचा साक्षीदार असलेले १९३७ सालातील ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहन पुन्हा एकदा नव्या रूपात सज्ज झाले आहे. मुंबई अग्निशमन दलाने अत्यंत कौशल्याने पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.
​ १९३७मध्ये टर्न टेबल शिडीची लेलँड कंपनीत निर्मिती झाली होती. ते २४ सप्टेंबर १९४१ला मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाले होते. ​अनेक दशके बंद असलेल्या या वाहनाचे सुट्टे भाग उपलब्ध नव्हते. जे. के. इन्व्हेस्टर बॉम्बे लिमिटेडच्या ‘सुपर कार क्लब गॅरेज’मध्ये जुने आराखडे शोधून, आधुनिक तंत्रज्ञानाने नवीन भाग तयार करण्यात आले. हे वाहन आता पुन्हा रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाले आहे. ​या सोहळ्याला अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर आणि उद्योजक गौतम सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भायखळा अग्निशमन केंद्रात स्मृती म्हणून जतन केलेल्या या वाहनाला आता पुन्हा एकदा नवी झळाळी मिळाल्याने अग्निशमन दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
गोदी दुर्घटनेचे साक्षीदार
१४ एप्रिल १९४४ला मुंबई बंदरात ‘एस. एस. फोर्ट स्टिकिन’ या युद्धसामग्रीने भरलेल्या जहाजाला भीषण आग लागली होती. त्या ऐतिहासिक दुर्घटनेत उंच गोदामांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी या लोखंडी शिडीच्या वाहनाने मोलाची भूमिका बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com